मालवाहतुकीत मध्य रेल्वे सुसाट; ९,४४६ कोटींचा महसूल जमा

विकासात ७५ दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतुकीत कामगिरीत मध्य रेल्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेट टन किलोमीटर (एनटीकेएम), जे प्रति किलोमीटर वाहून नेले जाणारे एक टन पेलोड आहे, त्यातही मागील वर्षाच्या तुलनेत ८.१ टक्के वाढ झाली आहे.
मालवाहतुकीत मध्य रेल्वे सुसाट; ९,४४६ कोटींचा महसूल जमा

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने मालवाहतुकीत उत्तम कामगिरी केली आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात ८९.२४ दशलक्ष टन इतकी मालवाहतूक लोडिंग केली असून मागील वर्षाच्या ८१.८८ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालमत्ता वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ९,४४६ कोटी रुपये जमा झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मार्च २०२४ मध्ये ९.०४ दशलक्ष टन मालवाहतूक केली, तर मार्च २०२३ मध्ये ८.६९ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. ४.०२ टक्क्यांच्या वाढीसह हा मार्च महिन्यातील मालवाहतुकीचा आतापर्यंतचा सर्वोत्तम आकडा आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८९.०५ दशलक्ष टन मालवाहतूकीचे लक्ष्यही ओलांडले आहे. विकासात ७५ दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतुकीत कामगिरीत मध्य रेल्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेट टन किलोमीटर (एनटीकेएम), जे प्रति किलोमीटर वाहून नेले जाणारे एक टन पेलोड आहे, त्यातही मागील वर्षाच्या तुलनेत ८.१ टक्के वाढ झाली आहे.

आकडेवारीवर एक नजर

  • गेल्या वर्षीच्या १५१४ रेकच्या तुलनेत १९२७ स्टीलचे रेक (२७.३ टक्क्यांची वाढ)

  • गेल्या वर्षी १०२० रेकच्या तुलनेत ऑटोमोबाईल्सचे ११७८ रेक (१५.५ टक्क्यांची वाढ)

  • गेल्या वर्षी ९७३९ रेकच्या तुलनेत १०,६३९ कोळशाचे रेक (९.२ टक्क्यांची वाढ)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in