‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ मुंबईकरांच्या पसंतीस

‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ मुंबईकरांच्या पसंतीस

कोस्टल रोडवर आधारीत असलेल्या प्रदर्शनाला २८ मेपर्यंत मुदतवाढ
Published on

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर आधारित ‘किनारीमार्गाची भ्रमणगाथा’ हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या (एनसीपीए) सहकार्याने, नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’मधील दिलीप पिरामल आर्ट्स गॅलरीमध्ये २ मे २०२३ पासून भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या प्रदर्शनाला रविवारी, २८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई सागरी किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्पावर आधारित ‘किनारीमार्गाची भ्रमणगाथा’ हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, ‘एनसीपीए’चे चेअरमन के. एन. संतूक यांच्या मार्गदर्शनाखाली हे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. २ मेपासून आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट देवून प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाविषयी मुंबईकरांना आधीच खूप उत्सूकता असल्याने प्रदर्शनाला दररोज मोठी गर्दी होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे छायाचित्र प्रदर्शनात या प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभियंता उपस्थित असल्याने मुंबईकरांना या प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती मिळते आहे.

logo
marathi.freepressjournal.in