सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.
सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

मुंबई : सामान्य माणसाला ‘मत आहे, मात्र पत कुठे आहे?’ असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

कामगार नेते नरेंद्र पाटील, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले व आदी माथाडी नेते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय ‘माथाडी कायदा बचाव कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३४ मागे घेऊन माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक सरकारने करावी. ९४ वर्षीय कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना नीट उभे राहता येत नाही, तरीही ते या कामगारांच्या घामाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. माथाडी मंडळाचे अधिकार काढून व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी व माथाडी कामगाराला देशोधडीला लावण्याचा विडा या सरकारने उचलला आहे. वारांगणेची उपमा या सरकारला लागू पडते, असा संतप्त सवाल यावेळी अनेक कामगार नेत्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in