'बेस्ट'च्या कंत्राटी कामगारांचा संप अखेर मागे ; कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या कंत्राची कर्मचाऱ्यांशी मध्यरात्री बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली.
'बेस्ट'च्या कंत्राटी कामगारांचा संप अखेर मागे ; कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे चाकरमान्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. मागील सात दिवसांपासून हा संप सुरु होता. अखेर बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या कंत्राची कर्मचाऱ्यांशी मध्यरात्री बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कंत्राटी कामगारांनी मागण्यांसदर्भात चर्चा केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडली. तसंच बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर हा संप मागे घेतल्याचं कंत्राटी कामगारांकडून जाहीर करण्यात आलं. सर्व आगारीतील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे एकत्र येत संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

कंत्राटी कामगारांच्या 'या' मागण्या मान्य

* कंत्राटी कामगारांना बेसीक पगार 'अठरा हजार' करण्यात येणार

* कर्मचाऱ्यांना वार्षीक भरपगारी रजा देण्यात येणार

* दिवाळी बोनस देण्यात येणार

* कर्मचाऱ्यांची साप्ताहिक रजा भरुन मिळणार

* कर्मचाऱ्यांना वार्षीक वेतनवाढ देण्याबाबत कंपन्यांना सुचना देणार

* संप सुरु असलेल्या सात दिवसांचा पगार देण्यात येणार

* कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर कारवाई केली जाणार नाही.

मुंबईत 'बेस्ट' बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासांठी मागील सात दिवसांपासून संप पुकारला होता. कंत्राटी कामगारांना पागर वाढ मिळावी. तसंच बोनस , पगारी सुट्ट्या आणि इतर सोयी- सुविधा मिळण्यासाठी हा संप पुकारला होता. मुंबईतील आझाद मैदानावर हा संप पुकारण्यात आला होता. यानंतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. तसंत कामावर न परतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसंच त्यांचा मागण्यांबाबत विचार सुरु असून येत्या २४ ते ४८ तासांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं होत. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपात सहभागी असलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

मुंबईकरांचे हाल

गेल्या सात दिसांपासून हा संप सुरु होता. बेस्टला लोकल नंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाते. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तसंच शनिवारी आणि रविवारी लोकल ट्रेनच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. गेल्या सात दिवसांपासून मुंबईकर या त्रासाला सामोरं जात होता. आज अखेर हा संप मागे घेण्यात आल्याने परिस्थिती पुर्ववत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in