चालकांचे वेतन रोखणे कंत्राटदाराला भोवणार

पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चालकांचे वेतन रोखणे कंत्राटदाराला भोवणार

भाडेतत्त्वावरील बसेसवर चालक कंत्राटदाराचे असून चालकांना वेळीच वेतन देणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे; मात्र वेतन वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. चालकांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. चालकांच्या आंदोलनासह कंत्राटदार जबाबदार असून याच कारणावरुन कंत्राट रद्द करण्याची नोटीस बेस्ट उपक्रमाने बजावली आहे. त्यामुळे एमपी ग्रुप कंत्राटदारावर कारवाईची टांगती तलवार आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील २८० मिनी बस एमपी ग्रुपकडून चालवल्या जात आहेत. या कंपनीकडून चालकाला वेळेवर पगार दिला जात नाही. पगार रखडवण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने चालकांकडून कामबंद आंदोलन केले जाते. त्यामुळे ज्या मार्गावर या मिनी बसेस चालवल्या जातात. त्या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होते आहे. बेस्टने काही वेळा कंत्राटदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली आहे; मात्र तरीही सुधारणा न झाल्याने अखेर बेस्टने कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in