मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्याचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे
मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्याचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकाही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवणार आहे. या अभियानात ३५ लाख निवासस्थाने, आस्थापनांना ५० लाख मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे; मात्र या ५० लाख राष्ट्रध्वजांचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी विनंती मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली असून, आतापर्यंत १० लाख राष्ट्रध्वज प्राप्त झाले आहे. तर उर्वरित राष्ट्रध्वज दोन दिवसांत मिळणार असल्याचे समजते.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुंबई महापालिकेनेही मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप, मरिन ड्राईव्ह येथे 'लेझर शो' आयोजन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या अभियानात पालिकेच्या २४ वॉर्डस्तरावर ३५ लाख निवासस्थाने व विविध आस्थापने या ठिकाणी ५० लाख मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे; मात्र राज्य सरकारने राष्ट्रध्वजाचा खर्च करावा, अशी विनंती मुंबई महापालिकेने केल्याचे पालिकेच्या मध्यवर्ती विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in