पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर मिलन सबवेत पाणी साचल्याने तो बंद करण्यात येतो. मिलन सबवे पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने भूमिगत टाकी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपासून पूरमुक्तीचे काम हाती घेतले असून या कामाच्या खर्चात वाढ होत आहे. या कामांसाठीच्या वाढीव कामासह एकूण २३ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२३ रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, याआधी ३६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा २३ कोटी ३८ लाख ७३ हजारांनी वाढ झाल्याने मिलन सबवे पूरमुक्तीचा खर्च ५९ कोटी ३८ लाख ७३ हजारांवर पोहोचला आहे.