कोरोनाच्या चौथ्या लाटेची उलटी गिनती सुरु ,रुग्ण दुपटीची संख्या घसरती

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाची पहिली लाट उसळली होती.
कोरोनाच्या चौथ्या लाटेची उलटी गिनती सुरु ,रुग्ण दुपटीची संख्या घसरती

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असून रोज अडीच हजारांच्या घरात आढळणारी रुग्ण संख्या आता ५००च्या आत आली आहे. तर १२ हजारांच्या घरात गेलेली सक्रिय रुग्ण संख्या आता ७ हजारांवर आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी ६८६ दिवसांवर आला आहे. सक्रिय रुग्ण संख्येत घट आणि रुग्ण दुपटीची घसरती संख्या पहाता कोरोनाच्या चौथ्या लाटेची उलटी गिनती सुरु झाली आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाची पहिली लाट उसळली होती. त्यानंतर आणखी दोन लाटा धडकल्या होत्या. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे तिन्ही लाटा परतवण्यात यश आले. परंतु मे महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेने शिरकाव केला आणि रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाल्याने काही प्रमाणात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

मुंबईत आठवडाभरापूर्वी २६ जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७२७ इतकी होती. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४४४ दिवस होता. हे प्रमाण १४० हून जास्त दिवसांनी वाढून ५८४ दिवसांवर गेले आहे. तर रुग्ण वाढीचे प्रमाण ०.११३ वरून ०.०३७ पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुंबईत ७६७१ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in