मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद

दीड महिना मुंबईकरांची तहान भागवेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात वरुणराजाची अद्याप कृपादृष्टी न झाल्याने पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत ९.७६ टक्के पाणी उपलब्ध असून दीड महिना मुंबईकरांची तहान भागवेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाचे उपायुक्त अजय राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षी सातही धरणात २,२१,८९० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता. परंतु यावर्षी ८० हजार ६४८ दशलक्ष लिटर पाणी कमी झाले आहे.

यंदा पाऊस वेळे आधी बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. ९९ टक्के पाऊस होणार, अशी शुभ वार्ता दिली होती. मात्र जून महिना संपत आला तरी मुंबईसह राज्यातील अनेक भागात वरुणराजाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा सातही धरणात उपलब्ध आहे. मात्र पुढील १५ ते २० दिवसांत धरण क्षेत्रात वरुणराजाने दमदार हजेरी लावली नाही, तर मात्र पाणीबाणी परिस्थिती ओढावेल. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता पुढील दोन दिवसांत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे ही ते म्हणाले

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in