महापालिकांच्या आर्थिक स्थितीवरच मालमत्ता कर माफीचा निर्णय अवलंबून

मुंबईप्रमाणे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय इतर महापालिकेत घेता येऊ शकत नाही
महापालिकांच्या आर्थिक स्थितीवरच मालमत्ता कर माफीचा निर्णय अवलंबून
Published on

मुंबई : राज्यातील महापालिकांमध्ये पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या संदर्भात त्या-त्या महापालिकांच्या आर्थिक परिस्थितीचा आधी अभ्यास करण्यात येईल. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

पुणे महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील लक्षवेधी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मांडली होती. मुंबई महापालिकेचा कायदा वेगळा असल्याचे सांगून उदय सामंत म्हणाले, ‘‘त्यामुळे मुंबईप्रमाणे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय इतर महापालिकेत घेता येऊ शकत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले आहे. तिथे हे धोरण यशस्वी झाले तर इतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघून त्याची अंमलबजावणी करता येईल का, याचा अभ्यास केला जाईल,’’ असे सामंत यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in