पालिका प्रशासनाने पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी घेतला हा निर्णय

अरुंद रस्ते रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
पालिका प्रशासनाने पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी घेतला हा निर्णय
Published on

मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिले भूमिगत पार्किंग झोन दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक व माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, हुतात्मा चौक येथे २००, तर माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ४०० गाड्यांची पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

अरुंद रस्ते रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यात मुंबईच्या रस्त्यांवर रोज शेकडो नवीन गाड्याची भर पडते. मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत जागेची समस्या असल्याने पालिका प्रशासनाने भूमिगत पार्किंग झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून दक्षिण मुंबईत होणारे भूमिगत पार्किंग झोन हे पहिलेच असणार आहे, असेही महाले यांनी सांगितले. दरम्यान, भूमिगत पार्किंग झोन निर्माण झाल्यानंतर मुंबईतील पार्किंगची समस्या दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in