"द डीप इम्पॅक्ट" चित्रप्रदर्शनाला सुरुवात

मिश्रा यांनी देशातील व विदेशातील अनेक कलादालनातून आपल्या चित्रांची एकल व सामूहिक कलाप्रदर्शने भरवली आहेत
"द डीप इम्पॅक्ट"  चित्रप्रदर्शनाला सुरुवात

चित्रकार डॉ.शार्दूल मिश्रा यांच्या "द डीप इम्पॅक्ट" (ब्लिसफूल ड्रॉइंग्ज) या शिर्षकांतर्गत कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे २ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ८ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य बघता येणार आहे.

मिश्रा यांनी पेन ऑन पेपर आणि कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे हे एकल प्रदर्शन आहे. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे मानवी आयुष्यातील विविध दृश्यमान पैलूंचे व वास्तवाचे तसेच अप्रतिम सृष्टिसौंदर्याचे सर्वांना उत्कट दर्शन घडवतील. याआधी मिश्रा यांनी देशातील व विदेशातील अनेक कलादालनातून आपल्या चित्रांची एकल व सामूहिक कलाप्रदर्शने भरवली आहेत. त्यांची चित्रे देश विदेशातील अनेक मान्यवर संग्राहकांकडे व कलाप्रवर्तक संस्थांकडे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in