जागतिक बाजारावर शेअर बाजाराची दिशा अवलंबून

जागतिक आघाडीवर युरोपियन सेंट्रल बँक ८ सप्टेंबर रोजी व्याजदराचा निर्णय घेईल
जागतिक बाजारावर शेअर बाजाराची दिशा अवलंबून

शेअर बाजार या आठवड्यात जागतिक बाजारातील कल, विदेशी गुंतवणूक संस्थांची भूमिका आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता यावर अवलंबून असेल. याबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, या आठवड्यातील प्रमुख जागतिक घडामोडी म्हणजे युरोपियन सेंट्रल बँकेचा व्याजदर आणि चीनचा महागाई दर असेल.

जागतिक आघाडीवर युरोपियन सेंट्रल बँक ८ सप्टेंबर रोजी व्याजदराचा निर्णय घेईल. याशिवाय ऑगस्टमधील सेवा क्षेत्राचा परचेस मॅनेजर इंडेक्स डेटाही बाजारावर परिणाम करेल. ही आकडेवारी सोमवारी समोर येईल.

कोणत्याही मोठ्या घडामोडी नसल्याने सर्वांची नजर जागतिक बाजारपेठांवर असेल. याशिवाय परकीय चलनाच्या कलावरही लक्ष ठेवलं जाईल. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ३०.५४ अंक किंवा ०.०५ टक्क्यानी घसरला होता, तर निफ्टी १९.४५ अंकांनी किंवा ०.११ टक्क्यानी घसरला होता.

ऑगस्टमध्ये विदेशी गुंतवणूक विक्रमी

विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये भारतीय इक्विटी मार्केटमध्ये ५१,२०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. डिपॉझिटरी डेटानुसार २० महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. यापूर्वी जुलैमध्ये त्यांनी सुमारे ५ हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. सलग नऊ महिने मोठ्या प्रमाणावर निव्वळ विक्री केल्यानंतर जुलैमध्ये एफपीआयने प्रथमच निव्वळ खरेदी केली. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान त्यांनी भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटी रुपये काढले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in