राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी सकल मराठा समाज आक्रमक ; लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकल मराठा समाजाकडून मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आलं असून या पत्रात लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी सकल मराठा समाज आक्रमक ; लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लालबागचा राजा सार्वजनिक गणपती नवसाला पावणारा गणपती अशी सर्वत्र ख्याती आहे. नुकतीच लालबागच्या राजाच्या मूर्तीची झलक सर्वांना पहायला मिळाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही देखील गणेशोत्सवाच्या काही वेळ आधी लालबागच्या राज्याची मूर्ती सर्वांना दाखवण्यात आली. यानंतर या मूर्तीचे छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यामुळे लालबागचा राजा मित्र मंडळ अडचणीत आलं आहे.

लालबागचा राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकरण्यात आली. ही बाब अनेकांना खटकली. यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसंच सकल मराठा समाजाकडून देखील आक्रमक पवित्रा घेत मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकल मराठा समाजाकडून मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आलं असून या पत्रात लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागचा राज्याच्या पायवार दाखवण्याचा मंडळाने जो प्रयत्न केला आहे. त्यामागचा हेतू शिवप्रेमींना कळलेला नाही. लालबागचा राजा मंडळाच्या या कृतीने शिवप्रेमींच्या भावा दुखावल्या आहेत. गणपती जरी देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते आज देवाऱ्यात आहेत. त्यामुळे ही राजमुद्रा त्यांच्या पायावर असणं पटत नाही. म्हणून मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे.

काय आहे प्रकरण ?

यंदा लालबागच्या राजाचं ९० वे वर्ष आहे. यावर्षी गणपती उत्सवासाठी शिवराज्याभिषेकाचा देखावा करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने लालबागचा राजाची मूर्ती आणि आजूबाजूची सजावट करण्यात आली आहे. गणेशमूर्तीच्या पितांबरावर नक्षीकाम करण्यात आले आहे. या सजावटीदरम्यान गणपतीच्या पायावर शिवमुद्रेची प्रतिमा कारण्यात आली आहे. यावर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in