2400 कोटी रुपये खर्चून CSMT स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार ; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

सीएसएमटीसोबतच देशभरातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं दानवे म्हणाले
2400 कोटी रुपये खर्चून CSMT स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार ; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती
Published on

मुंबईसह देशाची शान असेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा लवकर कायापालट केला जाणार आहे. नव्या वर्षापासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. या स्थानकात आता प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. या कामाला 2 हजार 400 कोटी खर्च येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

या स्थानकाचा कायापालट करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे सीएसएमटीसोबतच देशभरातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

सीएसएमटी स्थानकाला जागतिक दर्जाचं मल्टिमॉडेल हब बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने तयार केला आहे. मध्यरेल्वेचं मुख्यालय असलेली ही वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.

ही इमारत गॉथिक शैलीतील असून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 2008 पासून या इमारतीचं पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र, जागतिक वारसा असल्याने या परिसराचं काम करण्यास अनेक अडचणी येत होत्या.

logo
marathi.freepressjournal.in