गेट वे ऑफ इंडियाचा चेहरामोहरा बदलणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा नुकताच आढावा घेतला.
गेट वे ऑफ इंडियाचा चेहरामोहरा बदलणार

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून पदपथाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १६ कोटी रुपये खर्चणार असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. यानंतर मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले. त्यानंतर मुंबईचे डिसेंबर अखेरपर्यंत ५० टक्के तर मार्च २०२३ पर्यंत ५० टक्के सौंदरीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथून सौदयकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यात पदपथाचे सौदयकरण, रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in