कासारवाडीचा चेहरामोहरा बदलणार; मोकळ्या हवेसह सोयीसुविधा मिळणार

२४० भाडेकरूंना खेळत्या हवेसह सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कासारवाडीचा चेहरामोहरा बदलणार; मोकळ्या हवेसह सोयीसुविधा मिळणार
Published on

मुंबई : दादर, माहिम येथे असलेल्या कासारवाडीचा चेहरामोहरा बदलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच कासारवाडीला भेट देत येथे सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे आता कासारवाडीचा कायापालट होणार असून २४० भाडेकरूंना खेळत्या हवेसह सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास सध्या आश्रय योजनेतंर्गत हाती घेण्यात आला आहे. मात्र, माहिम दादर कासारवाडीतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आश्रय योजनेतंर्गत नेमलेल्या विकासक कंत्राटदाराचा प्रस्ताव स्थायी समितीने नाकारल्याने या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग बंद झाला होता. सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करताना याच वसाहतींमध्ये प्रथम पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, परंतु त्याच वसाहतींचा पुनर्विकास प्रकल्प रद्द झाल्याने येथील भाडेकरूंना जुन्याच घरात राहण्याची वेळ आली होती.

१३ चाळी, २४० भाडेकरूंना दिलासा!

कासारवाडीतील या सफाई कामगारांच्या वसाहतीतील चाळी या १९४० पूर्वीच्या असून याठिकाणी तळ अधिक एक मजल्याच्या दोन अधिक इतर बैठ्या अशा प्रकारे १३ चाळी आहेत. या ठिकाणी सुमारे २४० भाडेकरू राहत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in