वीजग्राहकांना बिल भरण्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ ची सुविधा उपलब्ध

कुलाबा येथील बेस्ट भवन मुख्यालयातील बस आगारात हा कार्यक्रम पार पडला.
 वीजग्राहकांना बिल भरण्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ ची सुविधा उपलब्ध

बेस्ट बस प्रवाशांसह वीजग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने वीजग्राहकांसाठी वीजबिल भरण्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ची सुविधा उपलब्ध केली आहे. बेस्ट उपक्रम व टीजेएसबी बँकेने वीजग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली असून, १० लाख ५० हजार वीजग्राहकांना बिल भरण्याच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला.

कुलाबा येथील बेस्ट भवन मुख्यालयातील बस आगारात हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लोकेश चंद्र बोलत होते. स्वस्त व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रम नेहमीच प्रयत्नशील आहे. बेस्ट उपक्रमाचे १० लाख ५० हजार वीजग्राहक असून, वीजग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न असतो. वीजग्राहकांच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेतला. तसेच डायनॅमिक क्यूआर कोड लोकार्पण सोहळ्याप्रसंगी टीजेएसबी बँकेच्या टीमने कमी वेळेत ‘क्यूआर कोड’ची व्यवस्था करून दिल्याचे सांगत चंद्र यांनी बँकेच्या टीमचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in