भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची रोखली

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २५७.४३ अंक किंवा ०.४४ टक्का वधारुन ५९,०३१.३०वर बंद झाला.
भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची
रोखली

भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी दोन दिवसांची घसरण रोखत जवळपास अर्धा टक्का वधारले. मंगळवारी बँका, धातू आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाली. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपया ४ पैशांनी घसरुन ७९.८८ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २५७.४३ अंक किंवा ०.४४ टक्का वधारुन ५९,०३१.३०वर बंद झाला. दिवसभरात तो ५९,१९९.११ ही कमाल तर ५८,१७२.४८ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८६.८० अंक किंवा ०.५० टक्का वधारुन १७,५७७.५०वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व, टायटन, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा आणि इंडस‌्इंड बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, विप्रो आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात गसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत संमिश्र व्यवहार सुरु होते. वॉल स्ट्रीटमध्ये सोमवारी किंचित घट झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.४३ टक्के वाढून प्रति बॅरलचा भाव ९७.८५ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी ४५३.७७ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in