रेड नाॅट या पाणपक्ष्यांचे दर्शन प्रथमच ठाणे येथील खाडी परिसरात

रेड नाॅट या पाणपक्ष्यांचे दर्शन प्रथमच ठाणे येथील खाडी परिसरात
Published on

हिवाळ्यानंतर राज्यातील पाणथळ जागांवर अनेक स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमधून निरनिराळ्या प्रजातींचे पाणपक्षी राज्यातील पाणथळींवर दाखल होतात. अलीकडेच रेड नाॅट या पाणपक्ष्यांचे दर्शन प्रथमच ठाणे येथील खाडी परिसरात पक्षीअभ्यासकांना झाले आहे. भारतातून रेड नाॅट पक्ष्यांच्या तुरळक नोंदी असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा पक्षी आढळला आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केवळ गुजरातमध्ये आणि केरळमध्ये रेड नाॅट या पक्ष्याची नोंद मागील काही वर्षात झाली आहे. हा पक्षी जगभरात विविध ठिकाणी आधारून येत असला तरी त्याचे स्थलांतर आतापर्यंत अभ्यासण्यात आले नव्हते. हा पक्षी उत्तर अमेरिकेत वीण करतो, तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेमध्ये हिवाळी स्थलांतर करतो.

logo
marathi.freepressjournal.in