विरोधी पक्षनेत्यांच्या शब्दाला सरकार जुमानेना!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आझाद मैदानात येऊन प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतरही सरकारकडून अद्याप अंमलबजावणी होत नाही.
विरोधी पक्षनेत्यांच्या शब्दाला सरकार जुमानेना!

रमेश औताडे/मुंबई

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आझाद मैदानात येऊन प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतरही सरकारकडून अद्याप अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

२०२२ च्या पीएचडी करणाऱ्या तुकडीतील बार्टीच्या विद्यार्थ्यांना २० टक्के वाढीव तरतुदीसह फेलोशिप मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थी वर्षा जाधव म्हणाल्या की, “सरकारने २०२२ च्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे महाज्योती आणि सारथी या दोन संस्थानी फेलोशिप दिली आहे. अगदी त्याचप्रमाणे बार्टीच्या २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी.” सरकारने मात्र समान धोरण राबविण्याच्या नावाखाली २०२२ च्या बार्टीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक न्याय व आम्हाला एक न्याय असे का? असा सवाल करत सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे.

...नाहीतर आम्ही राज्यभरात आंदोलन करू

खोरीप संघटनेचे मुंबई कार्याध्यक्ष सलीम खतीब, सरचिटणीस विक्रांत पाटील आणि रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तारू यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी विनंती करत त्यांना आंदोलनस्थळी आमंत्रित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in