मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍ड'चा ग्रॅण्‍ड फिनाले

मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेन्शन सेंटर येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार आहे
मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍ड'चा ग्रॅण्‍ड फिनाले

मुंबई : ७१व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेन्शन सेंटर येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार आहे. याची घोषणा मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने मुंबईत पार पडलेल्या प्री लॉन्च इव्हेन्टमध्ये केली. यावेळी सध्याची मिस वर्ल्ड कुमारी कॅरोलिना बिएलॉस्का, माजी मिस वर्ल्ड विजेत्या कुमारी टोनी ॲन सिंग, कुमारी व्हेनेसा पोन्स डी लिऑन आणि कुमारी स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनच्‍या अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ले सीबीई उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in