शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरील नियंत्रण हवेतच

शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरून अनेकदा राजकारण तापले. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. मात्र धुळीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. अखेर शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मॅकनाईज व्हॅक्यूम सक्शन मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरील नियंत्रण हवेतच

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॅकनाईज व्हॅक्यूम सक्शन मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मात्र निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचण आल्याने निविदा उघडताच आल्या नाहीत. या मशीनचा वापर करण्यासाठी आयटीच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून याच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरून अनेकदा राजकारण तापले. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. मात्र धुळीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. अखेर शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मॅकनाईज व्हॅक्यूम सक्शन मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मागविलेल्या निविदा खुल्या करण्याची मंगळवारची शेवटची तारीख होती. सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या तांत्रिक अडथळ्यामुळे निविदा उघडता आल्या नाहीत. आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जात असून हा प्रस्ताव विशेष मंजुरीसाठी लवकरच निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीच्या नियंणासाठी या मैदानावर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या. मात्र पालिकेच्या जी उत्तर विभागाला यातही यश आले नाही. त्यामुळे आता मॅकनाईज व्हॅक्यूम सक्शन मशीन भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अडचण निर्माण झाल्याने निविदा प्रक्रिया उघडणे शक्य झाले नाही.

logo
marathi.freepressjournal.in