मुंबई
नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाने ३० मेपर्यंत दिला दिलासा
पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयाची संपदा गोळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने अडचणीत सापडलेले मीरा-भाईंदर भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाने ३० मेपर्यंत दिलासा दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सत्र न्यायालयात मेहता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र त्या अर्जावर ठाणे सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. मेहता यांना ३० मेपर्यंत पोलिसांना अटक न करण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली.
दरम्यान, भ्रष्टाचार व अपसंपदेबाबत तक्रार झाल्याने १९ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नरेंद्र मेहता व पत्नी सुमन मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.