कुर्ला नाईक नगर मधील अतिधोकादायक इमारत लवकरच जमीनदोस्त होणार

अतिधोकादायक इमारत असताना खोटे ऑडिट करुन भाडेकरुंच्या जीवाशी खेळ करणे घर मालकांला महागात पडले
कुर्ला नाईक नगर मधील अतिधोकादायक इमारत लवकरच जमीनदोस्त होणार

नाईक नगर सोसायटी अतिधोकादायक इमारत जाहीर करण्यात आली होती. इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, इमारत खाली केली नाही आणि इमारत कोसळली. तर एक इमारत रात्री उशिरा जमीनदोस्त करण्यात आली आहे. तर सोसायटीत उर्वरित दोन इमारती लवकरच जमीनदोस्त करण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुर्ला एल वॉर्डचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली.

नाईक नगर सोसायटीतील चार इमारती असून त्यापैकी एक इमारत कोसळली. त्यामुळे चार पैकी एक इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर उर्वरित दोन इमारती रिकाम्या करत जमीनदोस्त करण्यासाठी कंत्राट देण्यात येईल आणि लवकरच तिन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले.

अतिधोकादायक इमारत असताना खोटे ऑडिट करुन भाडेकरुंच्या जीवाशी खेळ करणे घर मालकांला महागात पडले. १९ जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेत दिलीप कृष्णा विश्वास याला अटक करण्यात आली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुर्ला नेहरु नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ (२), ३०८, ३३८, ३३७ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत १९ जण दगावले असून १० रहिवासी जखमी झाले होते. जखमींवर उपचार करुन घरी सोडण्यात आले, तर ४ जणांवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेप्रकरणी विश्वाससह घरमालक रजनी राठोड, किशोर चव्हाण, बाळकृष्ण राठोड व इतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद पाठक यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत धोकादायक असल्यामुळे ती पडू शकते हे माहिती असूनही जाणूनबुझून घर मालकासहित दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरे भाड्यावर राहण्यासाठी दिली होती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in