कोरोना बाधितांमध्ये तरुणांचीच रुग्णसंख्या सर्वाधिक

राज्यासह मुंबईमध्ये पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
कोरोना बाधितांमध्ये तरुणांचीच रुग्णसंख्या  सर्वाधिक

कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही तरुणांचीच असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सहआजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये ३० ते ३९ या वयोगटामध्ये कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ लाख २४ हजार ३८९ इतकी असून ४० ते ४९ या वयोगटामध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८८ हजार ७७४ इतकी नोंदवण्यात आली आहे. २० ते २९ या गटात १ लाख ८२ हजार ८०६ जणांना करोनाची लागण झाली आहे. मागील चारही लाटांमध्ये तरुण वर्गात संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येते.

शिक्षण, नोकरी तसेच सार्वजनिक ठिकाणी कामानिमित्त असलेला वावर तरुणांमध्ये सर्वाधिक असल्याने त्यांच्यामध्ये संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते. राज्यासह मुंबईमध्ये पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ५० ते ७९ या वयोगटामध्ये संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ६० ते ६९ या वयोगटात ५२७३, तर ५० ते ५९ या वयोगटात ३९४२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. २० ते २९ या गटात २३७, तर ३० ते ३९मध्ये ६७४ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

सेव्हन हिल्स रुग्णालयात

नवा अभ्यास

चौथ्या लाटेमध्ये किती रुग्णांना संसर्गाची लागण झाली, त्यांचा वयोगट काय होता, संसर्ग किती वेळा झाला, या सर्व मुद्द्यांवर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. संसर्ग रोखण्यासाठीचा लसीकरणाची गरज, त्याचा प्रभाव आणि या लाटेमध्ये मृत्यू टाळण्यासाठी झालेला लाभ अशा विविध स्तरांवर हा अभ्यास केला जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in