हिमालय पादचारी पूल डिसेंबर अखेरपर्यंत लोकांच्या सेवेत दाखल होणार

सीएसएमटी रेल्वे स्थानकाला मागच्या बाजूला जोडणारा हिमालया पादचारी पूल पादचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता
 हिमालय पादचारी पूल डिसेंबर अखेरपर्यंत लोकांच्या सेवेत दाखल होणार

२०१९मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पूल कोसळला. आणि यात ३० जण जखमी झाले. तर ७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा पूल नव्याने उभारण्याचा निर्णय झाला. सध्या या पुलाचे केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण व्हायला अजून सहा महिन्यांत पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत हा नवीन पादचारी पूल लोकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकाला मागच्या बाजूला जोडणारा हिमालया पादचारी पूल पादचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता. हा पूल सीएसएमटी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी व डी. एन. रोड ओलांडण्यासाठी महत्त्वाचा एकमेव मार्ग होता. हा पूल १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी रहदारीच्या वेळी अचानक कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत ७ जण दगावले, तर ३० जण जखमी झाले होते. त्यामुळे पालिकेने हा पूल पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र पूल उभारणीला तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला. पुलाच्या डिझाईनमधील बदल त्यात पुलाच्या उभारणीचे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र जानेवारी २०२२पासून या कामाला पुन्हा सुरुवात झाली. पादचारी पुलाच्या उभारणीला कोविड काळात ही फटका बसला. त्यानंतर जानेवारी पासून कामाने वेग घेतला.सध्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि पलीकडे अंजुमन शाळा या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पिलर्स उभारण्यात आले आहेत. तर शिड्या उभारण्यासाठी आणखी दोन पिलर्स ची आवश्यकता असून त्यासाठी अंजुमन, जे.जे. आर्ट स्कूलच्या दिशेला आणखीन पिलरची उभारणी करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in