ब्रिटीशकालीन माईल स्टोनचा इतिहास आता उलघडला जाणार

१५० वर्षांपूर्वी हॉर्निमल सर्कल जवळील सेंट कॅथड्रल थॉमस चर्च येथून खरी मुंबई सुरु व्हायची.
ब्रिटीशकालीन माईल स्टोनचा इतिहास आता उलघडला जाणार

रस्ता कुठे जातो, हे दाखवण्यासाठी १५० वर्षांपूर्वी मैलाचे दगड मार्गदर्शक होते. या १५ माईल स्टोनचे जतन मुंबई महापालिकेने केले आहे. या ब्रिटीशकालीन माईल स्टोनचा इतिहास आता ‘क्यूआर कोड’ उलगडणार आहे. मुंबई महापालिकेच्या हेरिटेज विभागाने जतन केलेल्या माईल स्टोनवर ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर पालिकेची वेबसाइट आणि हेरिटेज सेलला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना ‘माईल स्टोन’ची माहिती उपलब्ध होणार आहे.

१५० वर्षांपूर्वी हॉर्निमल सर्कल जवळील सेंट कॅथड्रल थॉमस चर्च येथून खरी मुंबई सुरु व्हायची. त्यावेळी प्रवासासाठी बैलगाडी, घोडागाडी उपलब्ध होती. त्यावेळी कुठेही ये-जा करताना कुठला रस्ता कुठे जातो, हे दाखवण्यासाठी मैलाचे दगड मार्गदर्शक ठरत होते. सेंट कॅथड्रल थॉमस चर्च येथून मुंबईभर जाणाऱ्या रस्त्यांची दिशा माईल स्टोनमुळे दर्शवली जात होती. ‘झिरो’ मैलपासून मुंबईच्या पुढील मैला-मैलावर हे बेसॉल्टचे पंचकोनी दगड लावण्यात आले होते. यात शीव टँक, किल्ला येथे शेवटचा मैलाचा दगड आहे. हेरिटेज ग्रेड-वन म्हणून नोंद होणारे हे मैलाचे दगड मुंबईचा जसजसा विकास होत गेला, वाहतुकीची साधने बदलली, तसतसे दिसेनासे झाले; मात्र एकेकाळी अंतर मोजण्यासाठी महत्त्वाचे निशाण असलेल्या दगडांना पालिकेच्या हेरिटेज विभागाकडून मूळ रूप देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in