डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने गाठली नीचांकी पातळी,भारतीय बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण

दिवसभरात त्याने ७९.२४ ही मजबूत तर ७९.४९ ही नीचांकी पातळी गाठली होती.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने गाठली नीचांकी पातळी,भारतीय बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण
Published on

देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरीमुळे सोमवारी भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नवीन नीचांकी पातळी गाठली. जागतिक बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचा परिणाम रुपयाच्या घसरणीवर झाला. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण झाल्याने रुपयाची आणखी होणारी घसरण थांबली गेली, असे फॉरेक्स ट्रेडर्सने सांगितले.

सोमवारी सकाळी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७९.३० वर उघडला. दिवसभरात त्याने ७९.२४ ही मजबूत तर ७९.४९ ही नीचांकी पातळी गाठली होती. घसरणीचा हा कल कायम राहिल्याने व्यवहाराच्या अखेरीस तो ७९.४८ या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. शुक्रवारी रुपया२२ पैशांनी घसरुन ७९.४८ वर बंद झाला. त्याआधीच्या व्यवहाराच्या सत्रात तो ७९.२६ वर बंद झाला होता. मागील आठवड्यात तो ७९.३७ च्या पातळीवर पोहोचला तेव्हा रुपयाने आधीच्या तुलनेत नवी नीचांकी पातळी गाठली होती. या कालावधीत भारतीय शेअर बाजारातही ०.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. देशातील रुपयाच्या सातत्याने घसरणाऱ्या दरामुळे चिंता वाढत आहे. त्यावरून देशात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाला आहे. पंतप्रधान होण्याआधी रुपयाच्या घसरणीवर पंतप्रधान सरकारला घेरायचे, पण आता ते स्वतः पंतप्रधान असताना रुपयाच्या घसरणीवर काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in