पालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग होणार हायटेक: मुंबईकरांना मिळणार अद्ययावत सुविधा; पालिका ३१ कोटी रुपये खर्च करणार

स्मार्ट मुंबईकरांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उपक्रमांतर्गत व्हिडीओ अनॅलिटिक्सचा वापर करण्यात येणार आहे.
पालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग होणार हायटेक: मुंबईकरांना मिळणार अद्ययावत सुविधा; पालिका ३१ कोटी रुपये खर्च करणार

मुंबई : पाणी, मालमत्ता बिल, जन्म, मृत्यू प्रमाणपत्र या सुविधा अधिक जलद गतीने मुंबईकरांना मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणखी हायटेक करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी पालिकेने विविध योजना आखल्या आहेत. मुंबईतील नागरिकांना अद्ययावत सेवा अधिकाधिक जलद देता येतील यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी अनुकूलता, डेटा ड्रिवन गव्हर्नन्स, सुरक्षितता, लवचिकता आणि जीवनमान उंचावण्यासाठी कसा फायदा होईल, यासाठी तंत्रज्ञनाचा वाप करण्यात येणार असून, यासाठी ओपन सोर्स सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या सेवा वितरणात सुधारणा करण्याकरिता उद्योग प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. सॅप प्रणालीचाही वापर करण्यात येणार आहे. सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून भौगोलिक माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. स्मार्ट मुंबईकरांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उपक्रमांतर्गत व्हिडीओ अनॅलिटिक्सचा वापर करण्यात येणार आहे.

मालमत्तांची माहिती एका क्लिकवर!

पालिकेचा मालमत्ता विभागाला आपल्या मालमत्ता कुठे आणि किती आहेत. याबाबतची माहिती मिळविण्यासाठी आता माय बीएमसी बिल्डिंग आयडी इमारतीशी संबंधित माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या उपक्रमात विविध विभागांची अतिरिक्त माहिती एकत्रित करण्याचा पालिकेचा मानस आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in