पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपावला

२०१५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपावला

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्याची पानसरे कुटुंबीयांची मागणी अखेर हायकोर्टाने मान्य केली. राज्य सरकारने हा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यास हरकत नसल्याचे मान्य केल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाच्या तपासात एटीएसच्या अधिकाऱ्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सहकार्य करतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये, तर १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोल्हापुरातील या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते; मात्र इतकी वर्षे तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे एसआयटीच्या तपासाबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पानसरेंच्या हत्येला सात वर्षे लोटली असून, तपासात काहीच प्रगती होत नसल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. तसेच हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in