सतीश कौशिक यांच्या नावाने फसवणूक केल्याचे तपासात उघड

साहित्याचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणूक केली होती
सतीश कौशिक यांच्या नावाने फसवणूक केल्याचे तपासात उघड

मुंबई : शूटींगसाठी घेतलेल्या महागड्या कॅमेऱ्यासह इतर साहित्यांचा अपहार केल्याप्रकरणी सुरेश रमेश धुंदाले या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. सुरेशने दिवंगत सिनेदिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या प्रोडेक्शन हाऊसच्या नावाने ही फसवणूक केली असून, त्याने आतापर्यंत दोन व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या संतोष बनमाली साहू यांची स्वतची एक खासगी कंपनी असून, ही कंपनीत शूटींगसाठी लागणारे महागडे कॅमेर्‍यासह लेन्स व इतर साहित्य भाड्याने देण्याचे काम करते. कोरोनानंतर सुरेशने त्यांना फोन करून तो सतीश कौशिक यांच्या प्रोडेक्शन हाऊसमधून बोलत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून साडेअकरा लाख रुपयांचे कॅमेऱ्यासह इतर साहित्य शूटींगसाठी घेतले होते. या साहित्याचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणूक केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in