अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला

यंदाच्या सर्व्हेत धोकादायक इमारतींची संख्या ४ हजार ३९७ झाली
अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला

ठाणे महापालिका परिसरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धोकादायक इमारती कोसळून गेल्या काही वर्षात शेकडो निरपराधांचे बळी गेले आहेत. तर दुसरीकडे गेल्या सात वर्षात धोकादायक इमारतींची सख्या सुमारे पाचपट वाढली आहे. यंदाच्या सर्व्हेत धोकादायक इमारतींची संख्या ४ हजार ३९७ झाली आहे. यंदा अतिधोकादायक असलेल्या ७४ इमारती जमीनदोस्त कराव्या लागणार आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर हजारो कुटुंबांना आपली घरं सोडवी लागणार आहेत.

गेल्या काही वर्ष्याचा अनुभव पहाता, डोंगर परिसरात असलेल्या झोपड्या तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक बिल्डींगमधे रहाणार्‍या नागरीकांना जीव मुठीत घेवून रहात आहेत. पावसाळ्यात दरड कोसळणे, जमीन खचणे असे प्रकार वेळोवेळी घडत असतात यात बर्‍याचदा जिवितहानी होण्याचे प्रकारही घडले आहेत. कळवा मुंब्रा दरम्यानचा पारसिक डोंगराचा पूर्वेकडचा भाग, मुंब्रा रेल्वेस्टेशन जवळच्या परिसरात बेकायदा बिल्डींगानी कळस गाठला आहे. कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागा सह कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर, आनंद नगर, गणपती पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोणेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर या सर्वच परिसरात बेकायदा झोपडपटट्या आणि अनधिकृत बिल्डिंग मोठ्या प्रमाणात आहेत. याच प्रकारे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, इंदिरा नगर, रूपादेवी पाडा, लोकमान्य नगर, राम नगर या ठिकाणच्या डोंगरावर बेकायदा झोपड्याच नव्हे तर किसन नगर, लोकमान्यनगर, यशोधन नगर, सावरकर नगर या परिसरात अनधिकृत आणि धोकादायक इमारतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे

मुख्यत: पावसाळ्यात दुर्घटना घडत असतात. नियोजनाचा अभाव, कशाही आणि कुठेही जागा मिळेल तिथे बांधलेल्या झोपड्या आणि बेकायदा बिल्डींग त्या ठिकाणी जायला चांगले रस्ते नाहीत त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर मदतकार्य करण्यासाठी जाणर्‍यांनाही वेळेत पोहोचता येत नाही, अग्निशमनदलाच्या गाड्याही जावू शकत नाहीत अशी भयावह परिस्थिती ठाणे शहर आणि परिसरात हे गेल्या काही वर्षात अशा परिसरात लहान मोठ्या बर्‍याच दुर्घटना घडल्या आहेत. आठ वर्षापूर्वी मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते तसेच ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. गेल्या पाच वर्षात ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बिल्डींग कोसळून शेकडो बळी गेले आहेत परंतू अशा दुर्घटनांमधून पालिका प्रशासनाने काही धडा घेतला असल्याचे दिसत नाही. शहरात सध्या ७४ अति धोकादायक इमारती असून त्या सर्व रिकाम्या करून पाडाव्या लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in