आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारीत मार्गी लागेल- दीपक केसरकर

ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात मार्गी लागेल. फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी असेल त्याबाबत समाजाने निशंक राहावे-दीपक केसरकर
आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारीत मार्गी लागेल- दीपक केसरकर
ANI
Published on

प्रतिनिधी/मुंबई : ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात मार्गी लागेल. फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी असेल त्याबाबत समाजाने निशंक राहावे. सरकार सकारात्मक असून, सर्व प्रयत्न करीत असताना मुंबईत येवून आंदोलन छेडणे समाजाच्या व राज्याचे हिताचे नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलन करण्याच्या आपल्या भुमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईकडे निघाले असून, २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाजानेही मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट करत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

आतापर्यत झालेले काम हे मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे ७० वर्षात जे काम कोणीही केले नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केले आहे याची मराठा समाजाने आवर्जुन नोंद घ्यावी, असे सांगून दीपक केसरकर म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यत ३२ हजार कुणबी नोंदी आढळुन आलेल्या आहेत. त्यापैकी २४ हजार मराठा बांधवांना मराठा कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत. ३२ हजार नोंदीच्या आधारे १३ ते १४ लाख बांधवांना कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in