वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

गायरान जमीनीसह एसआरए पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार; सरकारचे आश्वासन
वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : गायरान जमिनीवरील अतिक्रमण करून घर बांधले असल्यास पाडले जाणार नाही, शेत जमीनीसाठी अतिक्रमण केले, त्यांचे पीक नष्ट केले किंवा त्याचा लिलाव होणार नाही. एसआरएचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागेल असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे आजच्या प्रचंड मोर्चामुळे आपण अर्धी लढाई जिंकलो आहोत, अशी ठाम ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयासमोर विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, पालिका मुख्यालयासमोर हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्यांवर यशस्वी चर्चा झाली. बीडीडी चाळींच्या विषयांवर मात्र अर्धी चर्चा झाली आहे. तो प्रश्नही आपण लवकरच मार्गी लावू, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील गायरान जमीनी, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, बीडीडी चाळीचा पुनर्विकास आदी विषयांवर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पालिका मुख्यालयासमोर अडविण्यात आला. यावेळी झालेल्या जाहिर सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. मुंबई, नवीमुंबईसह राज्याच्या विविध भागातून या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक आले होते. 'गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गायरान जमीनी हक्क मिळालाच पाहिजे', अशा घोषणा देत पालिका मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. गेल्या महिनाभर या मोर्चाची तयारी सुरू होती. मोर्चा विराट निघाला. यावेळी विभागवार पक्षाच्या पदाधिका-याची भाषणे झाली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्याची यशस्वी चर्चा झाली, अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

गायरान जमीनीवर ज्यांनी अतिक्रण केली आहेत. त्यांचे घर पाडले जाणार नाही. त्यांची घराचे पट्टे त्यांच्या नावावर केले जातील. तालुका जिल्हा स्तरावर अर्ज तेथे भरून द्या, त्यासाठी मोर्चा काढू नका. ज्या जमीनी शेतीसाठी अतिक्रमित केल्या आहेत. त्यातील पिके नष्ट केली जाणार नाही किंवा त्यांच्या लिलाव होणार आहे. जो कसेल त्याला पिक मिळेल, अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत, असेही आंबेडकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in