
पश्चिम व पूर्व उपनगराला जोडणारा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलावरील सांधे (एक्सपान्शन जॉइंट) बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी १३ ते २४ मेदरम्यान पूल वाहतुकीस बंद राहणार असल्याचे एमएसआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर (जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता) पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम १३ ते २४ मे दरम्यान केले जाणार असून, या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. या २०० बेअरिंग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम यापूर्वी सुरू करण्यात आले आहे.
बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. वाहतूक बंद न करता बेअरिंग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० पैकी १४८ बेअरिंग बदलण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. जितके बेअरिंग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील एक्सपान्शन जॉइंट आता बदलण्यात येतील. या कामासाठी उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहणार आहे.