कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास झाला सुपरफास्ट

सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस ही २० सप्टेंबरपासून डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर धावत आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास झाला सुपरफास्ट

सीएसएमटी-मडगाव मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. २० सप्टेंबरपासून ही एक्स्प्रेस सुपरफास्ट म्हणून चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांचे दोन तास १० मिनिटे वाचणार आहेत.

गाडी क्रमांक १०११२ आणि गाडी क्रमांक १०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस ही २० सप्टेंबरपासून डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर धावत आहे. त्याच्या गाडी क्रमांकातही बदल करण्यात आला असून सुपरफास्ट झालेली कोकणकन्या एक्स्प्रेस २०१११ आणि २०११२ या नव्या क्रमांकासह सेवेत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस पूर्वी मडगाव येथून दुपारी ४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचत होती. आता नव्या बदलांसह ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ७ वाजता सुटून सीएसएमटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासात दोन तास १० मिनिटांची बचत झाली आहे. सीएसएमटी-मडगाव सुपरफास्ट एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणेच रात्री ११ वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in