जेजे रुग्णालयात मॉड्युलर ओटीचे काम अंतिम टप्प्यात

सर जेजे रुग्णालयात दहा वर्षांपूर्वी तीन मॉड्यूलर ओटी तयार करण्यात आल्या होत्या
जेजे रुग्णालयात मॉड्युलर ओटीचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई : मुंबईतील जेजे रूग्णालयात अत्याधुनिक अशा तीन शस्त्रक्रियागृहांचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिन्याभरात ही शस्त्रक्रियागृह सुरू होणार आहेत.

सर जेजे रुग्णालयात दहा वर्षांपूर्वी तीन मॉड्यूलर ओटी तयार करण्यात आल्या होत्या. सध्या या ओटीमध्ये १० ते १२ रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षात घेऊन आणखी नव्या तीन अत्याधुनिक मॉड्यूलर ओटी तयार करण्यात आल्या आहेत. यात इन्फेक्शनचे प्रमाण कमी असेल, इनबिल्ड लेप्रोस्कोपीमुळे डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांना ही शस्त्रक्रिया पाहता येणार आहे. याचसोबत शस्त्रक्रियेसाठी जर अन्य रुग्णालय किंवा परदेशातील डॉक्टरांचे मार्गदर्शनदेखील घेता येणार आहे. या शस्त्रक्रिया विभागाचे सर्व दरवाजे सेन्सरने सज्ज असतील तर सर्व स्क्रिन टचस्क्रिन पद्धतीच्या असतील. या शस्त्रक्रियागृहात आता दिवसाला २० ते २२ शस्त्रकिया होऊ शकणार आहेत, अशी माहिती जेजे रुग्णालयाच्या शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली

logo
marathi.freepressjournal.in