कोळी महिला सरवणकरांवर संतापली; प्रश्नांचा भडिमार :मुलाला धमकी दिल्याची तक्रार दाखल

Maharashtra assembly elections 2024 : शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेने सरवणकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आपल्या उत्तरांनी महिलेचे समाधान होत नसल्याचे पाहून सरवणकर यांना अखेर तेथून काढता पाय घ्यावा लागला.
कोळी महिला सरवणकरांवर संतापली; प्रश्नांचा भडिमार :मुलाला धमकी दिल्याची तक्रार दाखल
एक्स
Published on

मुंबई : शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेने सरवणकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आपल्या उत्तरांनी महिलेचे समाधान होत नसल्याचे पाहून सरवणकर यांना अखेर तेथून काढता पाय घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.

माहीम कॉजवेमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय मंगला तांडेल यांनी माहीम पोलीस स्थानक गाठून घडलेला प्रकार आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला देण्यात आलेली धमकी याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. मंगला यांचा २४ वर्षीय मुलगा जश शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या दोघांनी व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून धमकी दिल्याचं मंगला तांडेल यांनी पोलिसांना सांगितलं.

मंगला तांडेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, सदा सरवणकर तांडेल यांची त्यांच्या राहत्या गल्लीत प्रचारफेरी सुरू होती. त्यावेळी तांडेल यांनी त्यांना विचारले की रेतीबंदर येथे असलेले आमचे सी फूड प्लाझा का बंद आहेत? त्याबद्दल तुम्ही काय केलं? त्यावरून सदा सरवणकर, 'ताई आपण ते सुरू करू, आपण नंतर बसून बोलू,' असे म्हणाले. त्यावेळी तांडेल यांनी त्यांना आत्ताच उत्तर द्या, असं म्हटल्याने सरवणकर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथून निघून गेले.

माझा मुलगा जश याने मला फोन करून सांगितलं की त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या साहील तांडेल आणि हृतिकेश तांडेल यांचे व्हॉट्सॲप कॉल आले होते. त्यांनी त्याला कॉल करून 'तुझी आई आणि मावशीने सदा सरवणकरांना हाकलून लावलं. आम्ही आता तुझ्या बापाला मारणार, सोडणार नाही,' अशी जश यास धमकी दिली. सदरची घटना जरी घडली असली तरीही साहिल व हृतिकेश आमच्या परिचयाचे आहेत. ते माझा मुलगा जशचे मित्र आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार सध्या करायची नाही.मुंबई : शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेने सरवणकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आपल्या उत्तरांनी महिलेचे समाधान होत नसल्याचे पाहून सरवणकर यांना अखेर तेथून काढता पाय घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.

माहीम कॉजवेमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय मंगला तांडेल यांनी माहीम पोलीस स्थानक गाठून घडलेला प्रकार आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला देण्यात आलेली धमकी याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. मंगला यांचा २४ वर्षीय मुलगा जश शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या दोघांनी व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून धमकी दिल्याचं मंगला तांडेल यांनी पोलिसांना सांगितलं.

मंगला तांडेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, सदा सरवणकर तांडेल यांची त्यांच्या राहत्या गल्लीत प्रचारफेरी सुरू होती. त्यावेळी तांडेल यांनी त्यांना विचारले की रेतीबंदर येथे असलेले आमचे सी फूड प्लाझा का बंद आहेत? त्याबद्दल तुम्ही काय केलं? त्यावरून सदा सरवणकर, 'ताई आपण ते सुरू करू, आपण नंतर बसून बोलू,' असे म्हणाले. त्यावेळी तांडेल यांनी त्यांना आत्ताच उत्तर द्या, असं म्हटल्याने सरवणकर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथून निघून गेले.

माझा मुलगा जश याने मला फोन करून सांगितलं की त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या साहील तांडेल आणि हृतिकेश तांडेल यांचे व्हॉट्सॲप कॉल आले होते. त्यांनी त्याला कॉल करून 'तुझी आई आणि मावशीने सदा सरवणकरांना हाकलून लावलं. आम्ही आता तुझ्या बापाला मारणार, सोडणार नाही,' अशी जश यास धमकी दिली. सदरची घटना जरी घडली असली तरीही साहिल व हृतिकेश आमच्या परिचयाचे आहेत. ते माझा मुलगा जशचे मित्र आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार सध्या करायची नाही.

logo
marathi.freepressjournal.in