भाजपकडून शेवटची यादी जाहीर! नव्या चेहऱ्यांना संधी, तर 30 विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली

कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांच्या जागी वीरेंद्र रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे
भाजपकडून शेवटची यादी जाहीर!  नव्या चेहऱ्यांना संधी, तर 30 विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली
Published on

भाजपनं आज ९२ जणांची शेवटची यादी जाहीर केली असून या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत जवळपास विद्यमान ३० आमदारांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्याचं बरोबर या यादीत एकाही खासदाराचा समावेश नसून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, हे वृत्तही अफवा ठरले आहे. भाजपनं मध्यप्रदेशच्या विधानसभा उमेदवारांची यादी पाच टप्प्यात जाहीर केली होती. यात ही शेवटची यादी असून ही यादी अनेक विद्यमान आमदारांसाठी अप्रिय ठरली आहे. घोषित ९१ उमेदवारांमध्ये जवळपास ३० उमेदवार हे नवे आहेत. यामुळे जवळपास एकतृतीयांश नवे चेहरे भाजपनं दिले आहेत.

यावेळच्या उमेदवारी यादीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, असं बोललं जातं होतं. पण या मतदारसंघातून भाजपन देवेंद्रकुमार जैन यांना उमेदवारी दिली. खूप जणांना उमेदवारी नाकारली देखील. यात कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे.

कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांच्या जागी वीरेंद्र रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना या यादीत स्थान मिळालं . काँग्रेसमधून भाजपात आलेल्या महेंद्र सिंह सिसोदिया यांना बमोरीतून भाजपने उमेदवारी दिली आहे. तर अशोकनगर मतदारसंघातून जयपाल सिंह या शिंदे समर्थकाला उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय बडवाह मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार सचिन बिर्ला यांना यावेळी रिंगणात उतरवलं आहे. भाजपच्या या निर्णयामुळे खूप लोकं असंतुष्ट असल्याचं बोललं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in