मॉलच्या धर्तीवर पालिकेच्या मार्केटचा लुक ; शाकाहारी, मांसाहारी दुकानांचे स्वतंत्र मजले उभारणार

जोगेश्वरी येथील नवलकर मार्केट व बोरिवली पश्चिमेकडील बोरिवली मार्केटचे काम हाती घेण्यात येणार आहे
मॉलच्या धर्तीवर पालिकेच्या मार्केटचा लुक ; शाकाहारी, मांसाहारी दुकानांचे स्वतंत्र मजले उभारणार

फळे, भाज्या, मांसाहारी, किराणा दुकाने आता पालिकेच्या मार्केट्समध्ये स्वतंत्र मजल्यावर असणार आहेत. मुंबई महापालिकेची मार्केट्स नवीन डिझाइनमध्ये बांधण्यात येत असून मॉलच्या धर्तीवर मार्केटचा लुक असणार आहे. यामुळे ग्राहकांना एका ठिकाणी व्हेज अथवा नॉनव्हेज खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे. नवीन डिझाइननुसार मार्केटमध्ये सरकते जिने, लिफ्ट आणि नॉनव्हेज दुकानांसाठी स्वतंत्र प्रवेश असून सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. दरम्यान, जोगेश्वरी येथील नवलकर मार्केट व बोरिवली पश्चिमेकडील बोरिवली मार्केटचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेची ९२ मार्केट असून १७ हजार १६४ गाळेधारक आहेत. पालिकेच्या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. मॉलमध्ये किराणा दुकान, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, भाजी, मासांहार विक्रीची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने स्वतंत्र मजल्यावर असल्याचे पाहावयास मिळतात. स्वतंत्र दुकाने असल्याने ग्राहकाला ज्या कुठल्या वस्तूंची खरेदी करायची असल्यास एका ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच दुकानाबाहेरील परिसरात १० फूट मोकळी जागा ठेवण्यात येणार असून ये-जा करताना अडगळ निर्माण होऊ नये, हा मुख्य उद्देश असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात जोगेश्वरी येथील नवलकर मार्केट व बोरिवली पश्चिमेकडील बोरिवली मार्केटचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मार्केटचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख अधिकारी प्रकाश रसाळ यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in