बीएसईचे बाजार भांडवल ४०० लाख कोटींवर; सेन्सेक्स, निफ्टीचे नवे शिखर

बीएसई सेन्सेक्स ४९४.२८ अंकांनी किंवा ०.६७ टक्क्यानी वाढून ७४,७४२.५० या नव्या शिखरावर पोहोचला. दिवसभरात, तो ६२१.०८ अंक किंवा ०.८३ टक्क्यानी वाढून ७४,८६९.३० या विक्रमी उच्चांकावर पोहोचून माघारी फिरला. एनएसई निफ्टी १५२.६० अंकांनी किंवा ०.६८ टक्क्यानी वाढून २२,६६६.३० वर बंद झाला.
बीएसईचे बाजार भांडवल ४०० लाख कोटींवर; सेन्सेक्स, निफ्टीचे नवे शिखर

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी निर्देशांकांनी तेजीची नवी गुढी उभारल्याने बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सोमवारी सकाळी ४००.८६ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४,००,८६,७२२.७४ कोटी (४.८१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या वर्षी जुलैमध्ये ३०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. जागतिक बाजारपेठेतील आशावाद आणि विदेशी निधीचा ओघ आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक गाठला. इंडेक्समधील प्रमुख रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी आली. दरम्यान, सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात फारसा बदल झाला नाही. मागील बंद इतकाच डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.३१ इतकाच राहिला.

बीएसई सेन्सेक्स ४९४.२८ अंकांनी किंवा ०.६७ टक्क्यानी वाढून ७४,७४२.५० या नव्या शिखरावर पोहोचला. दिवसभरात, तो ६२१.०८ अंक किंवा ०.८३ टक्क्यानी वाढून ७४,८६९.३० या विक्रमी उच्चांकावर पोहोचून माघारी फिरला. एनएसई निफ्टी १५२.६० अंकांनी किंवा ०.६८ टक्क्यानी वाढून २२,६६६.३० वर बंद झाला. दिवसभरात, तो १८३.६ अंकांनी किंवा ०.८१ टक्क्यानी वाढून २२,६९७.३० या आजीवन उच्चांकावर पोहोचून माघारी फिरला.

सेन्सेक्सवर्गवारीत मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक आणि पॉवर ग्रिड या प्रमुख कंपन्यांचे समभाग वधारले. तर नेस्ले, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, टायटन, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिसच्या समभागात घसरण झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्च प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले की, अमेरिकन किरकोळ महागाई आकडेवारी आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या व्याजदर निर्णय या आठवड्यात होणार असल्याने जागतिक शेअर बाजारात मुख्यतः माफक हालचाली झाल्या. बीएसई मिडकॅप ०.२६ टक्क्यांनी वाढला तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.०६ टक्क्यानी घसरला. वाहन क्षेत्र १.६५ टक्क्यांनी, तेल आणि वायू १.५१ टक्क्यांनी, ऊर्जा १.२४ टक्के, ग्राहकोपगयोगी १.१४ , रिॲल्टी १.२१ टक्के, धातू १.१० टक्के आणि युटिलिटीज ०.९० टक्का वधारले. तर सेवा, टेक आणि आयटी क्षेत्रात घसरण झाली. बीएसईवर एकूण २६६ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला तर १२ समभागांनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.

आशियाई बाजारांमध्ये सेऊल, टोकियो आणि हाँगकाँग सकारात्मक क्षेत्रात बंद झाले तर शांघायमध्ये घसरण झाली. युरोपीय बाजार दुपारपर्यंत सकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होते. वॉल स्ट्रीट शुक्रवारी वाढीसह बंद झाला होता. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी १,६५९.२७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली, असे एक्स्चेंजची आकडेवारी सांगते. जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.८१ टक्क्यानी घसरून ९०.४३ अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले. चौथ्या तिमाहीत कंपन्यांची जोरदार कमाई होण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाली. वाहन, रिॲलिटी, तेल आणि वायू आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रात वाढ झाली आयटी क्षेत्रात किरकोळ घसरण झाली, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

बंधन बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले

बंधन बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने बंधन बँकेचे शेअर्स सोमवारी ६ टक्क्यांहून अधिक घसरले. बीएसईवर शेअर ६.३१ टक्क्यांनी घसरून १८४.९५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात तो ९ टक्क्यांनी घसरून १७९.५५ रुपयांवर आला. एनएसईवर, कंपनीचे शेअर्स ६.२० टक्क्यांनी घसरून प्रत्येकी १८५.१० रुपयांवर बंद झाले. दिवसभरात तो ९.१७ टक्क्यांनी घसरून १७९.२५ रुपयांवर आला. त्यामुळे बँकेचे बाजारमूल्य २,००४.४२ कोटी रुपयांनी घसरून २९,७९४.८९ कोटी रुपये झाले. दिवसभरात बीएसईवर कंपनीच्या ५५.९० लाख शेअर्स आणि एनएसईवर ६४१.९५ लाख शेअर्सचे व्यवहार झाले. घोष ९ जुलै २०२४ रोजी त्यांचा वर्तमान कार्यकाळ पूर्ण झाल्यावर एमडी आणि सीईओ म्हणून बँकेच्या सेवेतून निवृत्त होतील, असे बँकेने शुक्रवारी नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in