दादर स्थानकातून मोबाइल चोरी करणाऱ्याला २४ तासांमध्ये केले जेरबंद

मोबाइल चोरणारा आरोपी अलाउद्दीन शेख उर्फ बाटला (२६) याला मुद्देमालासह अटक केली आहे.
दादर स्थानकातून मोबाइल चोरी करणाऱ्याला  २४ तासांमध्ये केले जेरबंद

पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातून रविवारी सायंकाळी ६च्या सुमारास बोरिवलीला जाणारी लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा दीड लाख रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली. या चोराला २४ तासांमध्ये रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण पाहून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोबाइल चोरणारा आरोपी अलाउद्दीन शेख उर्फ बाटला (२६) याला मुद्देमालासह अटक केली आहे.

दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १वरून रविवारी सायंकाळच्या सुमारास सुटणारी बोरिवली धीमी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन बाटलाने एका प्रवाशाचा नामांकित कंपनीचा मोबाइल चोरला. प्रवाशाने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाइलचोरीबाबत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. आरोपीविषयी माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी सापळा रचून २४ तासांच्या आत १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मोबाइलसह बाटलाला सोमवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास पकडण्यात आले. बाटला वांद्रे येथे वास्तव्यास असून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in