राज्‍य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश १७ ऑगस्‍टपासून सुरु होणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार रखडला आणि अधिवेशनाची तारीखही पुढे जात राहिली
राज्‍य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश १७ ऑगस्‍टपासून सुरु होणार

राज्‍य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्‍या १७ ऑगस्‍टपासून मुंबईत हे अधिवेशन सुरू होणार आहे. राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्‍याला मान्यता दिली आहे. अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक कशा प्रकारे हल्‍ला करतात ते पाहावे लागणार आहे.

आधी पावसाळी अधिवेशनाची तारीख १८ जुलै जाहीर करण्यात आली होती; मात्र शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार रखडला आणि अधिवेशनाची तारीखही पुढे जात राहिली. १० ऑगस्‍टपासून अधिवेशन घेण्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्‍यानुसार तयारीही सुरू झाली होती. विधिमंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्‍या होत्‍या; मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्‍यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून अधिवेशन सुरू झाले, तर मंत्र्यांना उत्‍तरे देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, हे लक्षात घेता अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अधिवेशन १७ ऑगस्‍टपासून सुरू होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक विशेषतः शिवसेना टीकास्‍त्र सोडणार हे तर निश्चित आहे; मात्र विरोधक सरकारवर कशा प्रकारे हल्‍ला करणार हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in