दहिसर येथील स्कायवॉकवर ३० कोटींची मलमपट्टी; पुनर्बांधणीऐवजी डागडुजी

दहिसर (पश्चिम) येथील एल. टी. मार्गवर सध्या अस्तित्वात असलेली आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकण (एमएमआरडीए) मार्फत २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक २०१५ साली एमएमआरडीएकडून ‘जसे आहे तसे’ या तत्त्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते.
दहिसर येथील स्कायवॉकवर ३० कोटींची मलमपट्टी; पुनर्बांधणीऐवजी डागडुजी
Published on

मुंबई : पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी दहिसर पश्चिम येथे नवीन स्कायवॉक बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. यासाठी पालिकेने ३० कोटींच्या खर्चाची तरतूद केली. मात्र स्कायवॉक पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्याऐवजी फक्त डागडुजी सुरू असल्याने नवीन स्कायवॉक बांधणीच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळण सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

दहिसर (पश्चिम) येथील एल. टी. मार्गवर सध्या अस्तित्वात असलेली आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकण (एमएमआरडीए) मार्फत २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक २०१५ साली एमएमआरडीएकडून ‘जसे आहे तसे’ या तत्त्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. पण हे स्कायवॉक ताब्यात घेतल्यानंतर २०१६मध्ये या स्कायवॉकचा काही भाग कोसळला. त्यामुळे हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. अभय बांबोळे यांच्यामार्फत स्कायवॉकची संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला होता. त्यात स्कायवॉकच्या जीर्ण स्लॅब तोडून मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. परंतु या स्कायवॉकची दुरुस्ती वेळीच न झाल्याने पुन्हा या स्कायवॉकची तपासणी एससीजी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या सल्लागाराने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखापरिक्षण अहवाल केला. त्या अहवालानुसार स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जीन्यांसह आकाश मार्गिकेचा डेक स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याने ते बांधकाम पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याची शिफारस सल्लागाराने केली. मात्र पालिकेच्या माध्यमातून स्कायवॉकची पुनर्बांधणी कासवगतीने सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in