कोरोनाची चौथी लाट परतवण्यात पालिकेला यश

रुग्णसंख्येत घट होत असून रुग्णदुपटीचा कालावधी १८ सप्टेंबरला कालावधी ४६५० दिवसांवर पोहोचला आहे
कोरोनाची चौथी लाट परतवण्यात पालिकेला यश

गेल्या अडीच वर्षांपासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत असून आतापर्यंत कोरोनाच्या चार लाटा परतवण्यात पालिकेला यश आले आहे. मे २०२२ मध्ये कोरोनाची चौथी लाट धडकली आणि बाधित रुग्णांची संख्या दोन हजारांच्या घरात पोहोचली होती; मात्र योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे चौथी लाट रोखण्यात यश आल्याने बाधित रुग्णांची संख्या २०० च्या आत आली आहे, तर रुग्ण ११ जून रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६१ दिवसांवर घसरला होता. मात्र बाधित रुग्णसंख्येत घट होत असून रुग्णदुपटीचा कालावधी १८ सप्टेंबरला कालावधी ४६५० दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे.

तिसऱ्या लाटेनंतर मार्च महिन्यात दिवसाला ३० ते ४० रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी २४ मार्चला रुग्णदुपटीचा कालावधी २१ हजार ८६५ दिवस इतका नोंदवला गेला होता; मात्र या वर्षी पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढू लागली. २५ मे रोजी रुग्णदुपटीचा कालावधी ३,९७३ वर गेला होता. जूनमध्ये रोजची रुग्णसंख्या २ हजारांवर गेली. यामुळे ११ जूनला रुग्णदुपटीचा कालावधी ५६१ दिवसांवर घसरला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in