उपनगरातील पूल होणार मजबूत ५० पुलांची कामे पालिका हाती घेणार; २१ कोटींचा खर्च

वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या भागांचा समावेश असलेल्या तीन विभागांतील पुलांची कामे केली जाणार आहेत
उपनगरातील पूल होणार मजबूत ५० पुलांची कामे पालिका हाती घेणार; २१ कोटींचा खर्च

मुंबई : पश्चिम उपनगरातील ५० छोट्या पुलांची दुरुस्तीची कामे मुंबई महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. यात नव्या पुलांची उभारणी, जुन्या-जीर्ण झालेल्या पुलांची डागडुजी, काही पुलांच्या मार्गिकेचा विस्तार अशा कामांचा समावेश असणार आहे. यासाठी सुमारे ४१ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या भागांचा समावेश असलेल्या तीन विभागांतील पुलांची कामे केली जाणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी मे. एस.जी.सी. कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मालाड पी-उत्तर विभागातील १६ पूल, गोरेगाव पी-दक्षिण येथील २१ पूल आणि अंधेरी के-पश्चिम वॉर्डमधील १३ पुलांची निवड करण्यात आली.

मे. सी. ई. इन्फ्राचे (इंडिया) टेंडर कमी किमतीचे असल्याने या कंपनीला टेंडर देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या कंपनीने सप्टेंबर महिन्यात महापालिकेला पत्र पाठवले होते. लघुत्तम टेंडर आणि कंपनीकडे सध्या कोणतीही कामे नाहीत, अशी दोन कारणे महापालिकेने संबंधित कंपनीची टेंडरसाठी शिफारस करताना दिले आहे. या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) आणि मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि. या दोन कंपन्यांनी टेंडर भरले होते. मे. सी.ई. इन्फ्रा (इंडिया) या कंपनीने २४ कोटी ४१ लाख ५३ हजार ५८३ कोटी रुपयांची, तर मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि.ने २७ कोटी ८८ लाख ४२ हजार ११० कोटी रुपयांच्या निविदा भरल्या होत्या. या कामासाठी २१ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in