पालिकेच्या ऑपरेशन धडक मोहिमेत नर्सिंग होमच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश

पालिकेच्या ऑपरेशन धडक मोहिमेत नर्सिंग होमच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश

गेल्या काही वर्षांत आरोग्याचा बाजार मांडला असून पैसे कमवण्याच्या लालसेपोटी रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला आहे.
Published on

अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की, नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबईतील तब्बल १,२५८ नर्सिंग होमची झाडाझडती घेतली. पालिकेच्या या झाडाझडतीत नर्सिंग होम्सनी नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १० नर्सिंग होम्स विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६५० नर्सिंग होम्स कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ऑपरेशन धडक मोहिमेत नर्सिंग होमच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, चार नर्सिंग होम्सना प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांच्या जीवाची काळजी घेणे ही प्रत्येक रुग्णालयाची जबाबदारी. मात्र गेल्या काही वर्षांत आरोग्याचा बाजार मांडला असून पैसे कमवण्याच्या लालसेपोटी रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. मुंबईत १,२५८ नर्सिंग होम आहेत. यापैकी ४४१ ठिकाणी अग्नी सुरक्षा नियम धाब्यावर बसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ६५० नर्सिंग होम्सना नोटीस बजावण्यात आली आहे. तर नोटीस देऊन दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल १० नर्सिंग होम विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील नर्सिंग होममधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची धडक मोहिमे अंतर्गत तपासणी केली असता नियम धाब्यावर बसवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे नर्सिंग होम नव्हे तर मृत्यूचे घर झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in