वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात झालेल्या तरुणाच्या हत्येचा पर्दाफाश

हत्येनंतर मध्यप्रदेशातील उज्जेन शहरात पळून गेलेल्या टिकमसिंग भगवानसिंह पनवार या ३४ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली
वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात झालेल्या तरुणाच्या हत्येचा पर्दाफाश

मुंबई : वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात झालेल्या विक्रम सिंग या ३५ वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येचा रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. हत्येनंतर मध्यप्रदेशातील उज्जेन शहरात पळून गेलेल्या टिकमसिंग भगवानसिंह पनवार या ३४ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीन दिवसांपूर्वी मारहाण केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तीन दिवसांपूर्वी विक्रम सिंग याची काही अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना या गुन्हयांत टिकमसिंह याचा सहभाग उघडकीस आला होता, हत्येनंतर तो मध्यप्रदेशात पळून गेला होता. या माहितीनंतर रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उज्जैन येथून साघ्या वेशात पाळत ठेवून टिकमसिंह पनवार याला अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in