नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार

शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी तातडीने या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. नव्या सरकारला येत्या २ आणि ३ जुलै रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी दिले. या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील करण्याचा निर्णय पहिल्‍याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी तातडीने या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत येत्या २ आणि ३ जुलैला मुंबईत विशेष अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या अधिवेशनात हे नवे सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुमत चाचणी पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले. या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने शिंदे समर्थक सर्व आमदारांना लवकरच मुंबईत दाखल व्हावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in